[Verse 1]
अंधार दाटला
बेभानल्या दिशा
चकव्यात उभी
अंगार उरी विझलेला
हि साद की तुझा
आभास साजणा
गंधाळून येई
देह पुन्हा मिटलेला
विझल्या, विझल्या
राखेत नवा
वणवा कुठला उमजेना
झुरला, विरला
जीव आतुरला
का आज असा समजेना
आसावला जीव, गेलं
हरपून भान
[Chorus]
घे सावरून मन हे साजणा
घे सावरून मन हे साजणा
घे सावरून मन हे साजणा
घे सावरून मन हे साजणा
[Verse 2]
ओऽऽऽ काळजाच्या देशाला
जिव्हाराच्या वेशीला
आठवांचा मेघ दाटला
सुन्या सुन्या एकांती
तुझ्या चाहुली येता
उजळून जाती दिशा
ओऽऽ आता जिथे तिथे तुझे जरी होती भास रे
श्वासात गंध हा असा तुझी लावी आस रे
आसावला जीव, गेलं
हरपून भान
[Chorus]
घे सावरून मन हे साजणा
घे सावरून मन हे साजणा
घे सावरून मन हे साजणा
घे सावरून मन हे साजणा
[Outro]
साजणा..